नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मित्रांची पार्टी सुरू असताना मस्करी केल्याचा राग येऊन एकाने मित्राला डोक्यात लोखंडी रॉडने मारून दुखापत केल्याचा प्रकार नाशिकरोड परिसरात घडला. नितीन शंकर पगारे (रा. पगारे मळा, चेहडी शिव, नाशिकरोड) असे संशयिताचे नाव आहे.
तानाजी रघुनाथ जाधव (वय 42, रा. जाधव मळा, चेहडी शिव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, काल बनकर मळ्यात मित्रांची पार्टी सुरू असताना संशयितही सहभागी झाला. त्यावेळी थट्टामस्करी सुरू असताना संशयित नितीन पगारे याला राग आला. तो शेजारीच बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतून लोखंडी रॉड घेऊन आला.
त्यानंतर त्याने जाधव यांना रॉडने मारहाण केली. त्यात जाधव जखमी झाले. माझी मजाक करशील, तर तुझा बेत पाहील असा दमही दिला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: १०३/२०२४)