नाशिक: चालकाला धाक दाखवून मारहाण करत ३५ हजार रुपये लुटले

नाशिक (प्रतिनिधी): वाहनाला हात दाखवून थांबवत चालकाला मारहाण करत खाली उतरवून देत वाहन पळवून नेले. निर्जनस्थळी वाहनाच्या डिक्कीत ठेवलेली द्राक्ष भाड्याची ३५ हजारांची रक्कम लुटून नेल्याचा प्रकार पेठ रोडवरील एका पेट्रोलपंपासमोर घडला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: युवकाच्या खूनप्रकरणी महिलेसह चौघांना जन्मठेप !

याप्रकरणी म्हसरुळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवरे (रा. सिडको) यांच्या तक्रारीनुसार रात्री वाहन पेठरोड येथून येताना तीन अनोळखी इसमांनी वाहन थांबवले. संशयितांनी देवरेंना वाहनातून उतरवत वाहन पळवून नेले. देवरे वाहनामागे पळत जात असताना त्यांना एका हॉटेलजवळ आपले वाहन दिसले. देवरे यांनी गाडी तपासली असता डिक्कीतील रक्कम संशयितांनी लुटून नेल्याचे आढळले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790