नाशिक (प्रतिनिधी): पत्नीच्या माहेरी जात तेथे स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेत एका तरुणाने आत्महत्या केली. कौटुंबिक कलहातून त्याने आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात पुढे येत आहे.
विनोद राजाराम चव्हाण (वय ३०, रा. साई लॉन्सच्या बाजूला, नांदूर नाका) असे मृताचे नावे आहे. विनोद याची पत्नी कौटुंबिक कलहामुळे माहेरी गेली होती. सोमवारी (दि. ११) दुपारी दीड वाजता पती विनोद तेथे गेला.
त्याने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत तो गंभीर भाजल्याने मेव्हणा ऋषीकेश पवार यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना गुरूवारी वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषित केले. उपचारांदरम्यान गुरुवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पंचवटी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790