नाशिक: मद्यपीने फोडल्या कारच्या काचा; जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल

नाशिक (प्रतिनिधी): आगार टाकळी परिसरातील अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये सराईताने मद्याच्या नशेत असताना मागील भांडणाची कुरापत काढत, मुंबईला निघालेल्या एकाच्या कारच्या काचा फोडून दहशत पसरवली. तसेच कारचालकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी उपनगर पोलिसात सराईत गुन्हेगाराविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

साहिल खरनारे (२०, रा. साईप्लाझा बिलिडंग, रामदास स्वामीनगर, आगार टाकळी, उपनगर) असे संशयिताचे नाव आहे. विलास दत्ताराम मोरे (रा. हरिदर्शन सोसायटी, रामदास स्वामीनगर, टाकळीरोड) यांच्या फिर्यादीनुसार, संशयिताशी त्यांचे काही दिवसांपूर्वी वाद झाला होता.

हे ही वाचा:  नाशिक: वेब कास्टिंग कक्षाद्वारे जिल्ह्यातील मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे निरीक्षण

रविवारी (ता.१३) पहाटे मोरे हे कामानिमित्त मुंबईला जाण्यासाठी कारने निघाले. पार्किंगमधून कार बाहेर काढत असतांना, मद्याच्या नशेतील संशयित साहिल याने जुन्या भांडणाची कुरापत काढून मोरे यांना शिवीगाळ केली. ‘आज तुला आज जिवंत सोडणार नाही’, असे धमकावत कारच्या पाठीमागील काचेवर लोखंडी रॉडने मारून काच फोडली.

हे ही वाचा:  नाशिक: खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी

घाबरलेले मोरे हे कारमधून बाहेर आले नाहीत. तर, त्यामुळे संशयिताने कारची समोरच्या काचेवर रॉडने मारून फोडली. त्यामुळे घाबरलेल्या मोरे यांनी आरडाओरडा केल्याने अपार्टमेंट व कॉलनीतील नागरिक जमा झाले. ते पाहून संशयित साहिल याने पळ काढला. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी संशयित साहिल यास अटक केली आहे. (उपनगर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३५४/२०२४)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790