नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये खुनाच सत्र थांबता थांबत नाही आहे. आज अशाच एका घटनेत पतीने पत्नीची हत्या करून नंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
आडगाव शिवारातील इच्छामणी नगरमध्ये आज सकाळी पतीने पत्नीची हत्या करत स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. विशाल निवृत्ती घोरपडे असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव असून प्रिती विशाल घोरपडे असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. या हत्येमुळे नाशिक शहरासह इच्छामणी नगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आज पहाटेच्या सुमारास आडगाव परिसरातील इच्छामणी नगर परिसरात सदर घटना घडली आहे.
पतीने पत्नी झोपेत असताना तिच्या डोक्यात मुसळी टाकत हत्या केली असून अद्याप हत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. पोलीस पुढील तपास करीत आहेत. पत्नीची हत्या केल्यानंतर विशाल घोरपडे याने गळफास घेत आत्महत्या केली आहे.
ही घटना समजताच घोरपडे कुटुंबातील सदस्य घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरु केला आहे. पत्नीची हत्या करुन विशाल घोरपडे याने आत्महत्या का केली याचे याबाबत मात्र कोणतीही माहिती समोर आली नाही.
![]()


