Amazon

नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर यांचे निधन

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा.सूर्यकांत रहाळकर (Prof. Surykant Rahalkar) यांचे आज बुधवार (दि. १३ सप्टेंबर) रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.

वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेचा श्वास घेतला. रहाळकर यांनी प्राध्यापक म्हणून नाशिक येथील बी.वाय.के महाविद्यालयात अनेक विद्यार्थ्यांना शिक्षित करण्याचे काम केले होते…

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पत्नीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी डॉ. नीलेश जेजुरकर पोलिसांच्या ताब्यात

प्रा. सूर्यकांत रहाळकर हे व्यावसायिक देखील होते. त्यांनी बांधकाम व्यवसायात अनेक प्रकल्प हाती घेतले होते. तसेच धार्मिक कार्यात म्हणजेच मंदिर बांधणे, समाधी बांधणे यात ते नेहमी अग्रेसर होते. प्रा. सूर्यकांत रहाळकर हे निर्वाण इंडस्ट्री आणि रहाळकर सोडा फॅक्टरीचे देखील संचालक होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढणार; सोमवारी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट

त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम केले असून त्यांचा विद्यार्थी परिवार खूप मोठा आहे. रहाळकर यांच्यावर पंचवटी अमरधाम येथे सायंकाळी ७ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790