नाशिक (प्रतिनिधी): तरुणीचे सोशल मीडियावर अश्लील छायाचित्र आणि चित्रफीत प्रसारित करत बदनामी करण्याचा प्रकार उघडकीस आली आहे.
भद्रकाली पोलिस ठाण्यात तरुणाविरुद्ध आयटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी तरुणीची संशयित शुभम सियाराम चव्हाण यांच्याशी इन्स्टाग्रामवर २०१९ मध्ये ओळख झाली. त्यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चॅटिंग करणे सुरू केले. त्यांची ओळख वाढत गेली. एप्रिल २०२१ मध्ये इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथे दोघांनी भेट घेतली.
संशयिताने तरुणीस मित्राच्या घरी घेऊन जात त्या ठिकाणी काही वेळ चर्चा करून दोघेही आपापल्या घरी निघून गेले. त्यानंतर मे २०२१ वाढदिवसानिमित्त पुन्हा भेटले. मुंबई नाका येथील एका हॉटेलमध्ये संशयिताने तिला घेऊन जात हॉटेलमध्ये केक कापून वाढदिवस साजरा केला.
दरम्यान, दोघांचे शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. संशयिताने न कळत त्यांचे छायाचित्रण केले. डिसेंबर २०२२ मध्ये त्यांच्यात वाद झाला. तिने त्याच्याशी बोलणे बंद केले. संशयिताने तिला ब्लॅकमेल करणे सुरू केले.
तिने त्याकडे दुर्लक्ष केले असता, त्याने सोशल मीडियावर तिचे अश्लील छायाचित्र प्रसारित केले. तसेच तिचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करून अश्लील संदेश प्रसारित करत तिची बदनामी केली.
२०१९ ते सप्टेंबर २०२३ दरम्यान वारंवार त्रास देणे सुरू ठेवले. त्रासाला कंटाळून तरुणीने भद्रकाली पोलिसांची भेट घेत घटनेची माहिती दिली. पोलिसांनी यासंदर्भात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.