नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): थट्टा मस्करी दरम्यान गुप्तांगावर मारल्याने जखमी झालेल्या १५ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रशांत सुनील झिनवाल (वय १९, रा. जुनी स्टेशनवाडी, पवारवाडी, देवळाली कॅम्प) यांने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ७ मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास लवनित व त्याचे मित्र व त्याचे मित्र फिल्टरेशन प्लांटजवळ खेळत होते. त्यावेळी काही तरी कारणावरुन चेष्टा मस्करी सुरू झाली.
त्यात एका मित्राने लवनितच्या पोटात दोन बुक्केमारुन त्याला जमिनीवर खाली पाडले. त्यानंतर लवनितच्या गुप्त भागावर हाताचा कोपरा मारला. त्यात लवनित किरणकुमार भगवाने (वय १५, रा. जुनी स्टेशनवाडी, देवळाली कॅम्प) हा जागीच बेशुद्ध झाला.
मित्रांनी त्याला त्याला औषधोपचारासाठी दवाखान्यात नेले. मात्र उपचार सुरू असतानाच लवनितचा मृत्यू झाला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याचे सर्व नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आहिरे करीत आहेत.