नाशिक: दोन चिमुकल्यांना विष पाजून विवाहितेची आत्महत्या

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): आडगाव शिवारातील कोणार्कनगर भागात एका विवाहितेने इमारतीवरून उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (दि. ०८ मे २०२४) सकाळी घडली. आत्महत्येआधी विवाहितेची दोन्ही मुले मृतावस्थेत आढळल्याने त्यांना विष पाजून त्यांची हत्या केल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे आईने आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईलमध्ये व्हिडीओ बनविला आहे. तसेच सुसाईड नोटसुद्धा लिहिली आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: रस्त्यात अडवून जबरी लूट करणाऱ्या दोघांना अटक !

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, अश्विनी निकुंभ या विवाहितेने राहत्या घराच्या इमारतीवरुन चौथ्या मजल्यावरून आज सकाळी सात वाजेच्या सुमारास आत्महत्या केली. तिने घरगुती वादातून हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज पोलीस सूत्रांनी वर्तवला आहे. पोलीस घटनास्थळी आले असता त्यांना विवाहितेची ७ वर्षीय व २ वर्षीय या दोन्ही मुली मृत अवस्थेत आढळून आल्या. दोघींना विष पाजून त्यांची हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: सातपूर गोळीबारातील फरार शुभम निकम अखेर गजाआड

शवविच्छेदनानंतर या प्रकरणाचा उलगडा होईल, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अश्विनी निकुंभ यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत पोलीस तपास करीत असून, अधिक माहिती घेतली जात आहे.

सुसाईड नोटमध्ये व्यक्त केली शेवटची इच्छा:
अश्विनी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपले पती स्वप्नील निकुंभ यांच्यासह त्याचा भाऊ तेजस आणि बहीण मयुरी सोमवंशी यांच्या नावाने सुसाईड नोट लिहून तसेच आपल्या मोबाईलमध्ये देखील याबाबत व्हिडिओ बनवला आहे. यात त्यांनी शेवटची इच्छा म्हणून मृतदेहास पतीला हात लावू न देता आई व भावाने अंत्यसंस्कार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या घटनेबाबत अधिक तपास आडगाव पोलीस करत आहेत.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
Tags: