नाशिक (प्रतिनिधी): व्यावसायिकांना खोटे चेक देत फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेला संशयित न्यायालयाच्या तारखेस उपस्थित राहत नसल्याने त्याच्याविरोधात अटक वॉरंट काढले होते. वॉरंट निघाल्यानंतरही संशयित फरार होता. म्हसरुळ पोलिसांनी संशयिताचा माग काढून त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित अशोक मगन मोहिते (रा. बेलदारवाडी, म्हसरुळ) याने काही व्यापाऱ्यांकडून घरगुती इलेक्ट्रिकल साहित्य व वस्तू खरेदी केल्या होत्या. दुकानदारांना धनादेश दिले होते. धनादेश न वटल्याने व्यापाऱ्यांनी न्यायालयात कलम १३८ अंतर्गत खटला दाखल केला होता. न्यायालयात खटला सुरू असताना संशयित तारखांना गैरहजर रहात असल्याने न्यायालयाने त्याच्याविरोधात अटक वॉरंट काढले होते.
संशयित मिळून येत नव्हता. पथकाचे योगेश रास्कर यांना संशयिताबाबत माहिती मिळाल्याने म्हसरुळ परिसरात सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. उपनिरीक्षक मनोहर क्षीरसागर, प्रमोद गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
![]()


