Amazon

नाशिक: पोलीस अंमलदाराला चाकूने भोसकले; जखमी अवस्थेतही आरोपीला पकडले !

नाशिक (प्रतिनिधी): दिंडोरी नाक्यावर हातात चाकू फिरवत दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस अंमलदाराच्या पोटावर गुन्हेगाराने चाकूने दुखापत करून जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. सराईत गुन्हेगार आता खाकीवरच चाल करत असल्याने सामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पंडित कॉलनीत सफाई कामगाराचा भल्या पहाटे खून, सातपूरमध्ये युवकाला प्राणघातक हल्ला, पंचवटीत अपहरण करून युवकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनांपाठोपाठ गुन्हेशाखेच्या अंमलदाराच्या पोटातच संशयिताने चाकू खुपसल्याची घटना घडली आहे. शहरात गुंडाराज सुरू असल्याच्या घटना सध्या घडत असून, पोलिसांचा धाकच उरला नाही की अशी शंका घेतली जाऊ लागली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंग गडावर ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान नवरात्रोत्सव; १० ते २६ ऑक्टोबरपर्यंत घाट रस्ता खासगी वाहनांसाठी बंद

विकी संजय जाधव उर्फ गट्ट्या (रा. अवधुतवाडी, पंचवटी) असे संशयिताचे नाव आहे. मध्यर्ती गुन्हेशाखेतील सहायक उपनिरीक्षक नामदेव कारवाभी सोनवणे (५ ७, रा. धात्रकफाटा, आडगाव शिवार) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित गट्ट्या हा शुक्रवारी (ता. ४)रात्री हातात चाकू घेऊन अवधुतवाडी परिसरात नागरिकांमध्ये दहशत माजवत होता. त्यावेळी अंमलदार सोनवणे त्या रस्त्याने जात असताना त्यांनी संशयिताच्या हातातील चाकू हिसकावण्याचा प्रयत्न केला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: त्र्यंबकेश्वरला १२ ऑक्टोबरपर्यंत ‘व्हीआयपी’ दर्शन बंद

त्यावेळी संशयितांना त्यांनाही न जुमानता प्रतिकार करू लागला.”मी तुला मारून टाकेल” अशी धमकी देऊनही सोनवणे यांनी त्यास सोडले नाही. सोनवणे हे त्याच्या हातातील चाकू हिसकावून घेण्याचा प्रयत्न करीत असताना संशयिताने चाकू सोनवणे यांच्या पोटात खुपसला आणि पळ काढला. जखमी झाल्याच्या अवस्थेमध्ये सोनवणे यांनी त्याचा पाठलाग करून त्यास पकडले.

🔎 हे वाचलं का?:  मॉन्सूनची माघार वेगाने; महाराष्ट्राच्या निम्म्या भागातून पाऊस परतला

आणि पंचवटी पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पंचवटी पोलिसात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून, सहायक निरीक्षक व्ही. ए. पडोळकर हे तपास करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790