नाशिक। दि. ३० जून २०२५: सुनेकडून सासूला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार गंगापूर रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये घडला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात संशयित सुनेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
७९ वर्षीय सासूने दिलेल्या तक्रारीनुसार, सुनेने त्यांना वेळोवेळी शारीरिक व मानसिक त्रास देऊन सासूच्या अंगावर धावून जाऊन मारहाण केली. सासूला हृदयरोग आणि डायबेटीसचा त्रास असल्यामुळे चक्कर आली असता, वृद्धेचा मुलगा सोडवण्यास आला असतांना सुनेने कॉलर पकडून ओढून धरल्याने परत वृद्धा खाली पडली. त्यानंतर सुनेने सासूच्या पोटातही लाथ मारली आणि घराबाहेर काढून दिले.
सुनेने केलेल्या या क्रूर कृत्यामुळे वृद्ध सासूने पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनेविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसहित आई वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.