मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच; वेगवेगळय़ा भागात पार्क केलेल्या दोन दुचाकी चोरीला

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): शहरात वेगवेगळय़ा भागात पार्क केलेल्या दोन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी म्हसरूळ आणि इंदिरानगर पोलिस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: ऑनर किलिंग प्रकरणी सुप्रीम कोर्टात आरोपीला २० वर्षे कारावास

पेठरोडवरील मनोज अंबादास भोये (रा.गंगाधाम अपा.कंसारा नगर,इंद्रप्रस्थ कॉलनी) यांची एमएच १५ बीआर ४२१४ दुचाकी गेल्या २६ ऑक्टोंबर रोजी रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार सोनवणे करीत आहेत. दुसरी घटना पाथर्डी फाटा भागात घडली. संगिता विजय सोनवणे (रा.तपानी निवास दामोधरनगर,पाथर्डीफाटा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: चेन स्‍नॅचरसह दोघा सराफांना 3 वर्षे सश्रम कारावास !

सोनवणे यांची प्लेझर एमएच १५ एचटी ४७३५ गेल्या रविवारी (दि.२९) रात्री त्यांच्या बंगल्याच्या आवारात लावलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक बेजेकर करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790