नाशिक: गांजा विक्री करणाऱ्या महिलेस अटक

नाशिक (प्रतिनिधी): विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतः जवळ अडीच किलोचा गांजा बाळगणाऱ्या महिलेविरुद्ध कारवाई करून तिला अटक करण्यात आली आहे.

याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक वायकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की आरोपी जैरुन्निसा हजरत मन्सुरी (वय ४३, रा. मालधक्का रोड, देवळाली गाव, नाशिकरोड) ही महिला काल (दि. २८) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उपनगर येथे संघमित्रा सोसायटीसमोर २.५० किलोग्रॅम गांजा बाळगताना मिळून आली. यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत तिच्या ताब्यातून २.०५० किलोग्रॅम गांजा, ५०० रुपये किमतीचा छोटा इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, छोट्या प्लास्टिक पिशव्या, स्टॅपलर व त्याच्या पिना असा २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, या महिलेविरुद्ध एनडीपीएस अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल

या प्रकरणी उपनगर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत. (उपनगर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: २९०/२०२४)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790