नाशिक। दि. २८ ऑक्टोबर २०२५: सातपूर येथील औरा पबमधील गोळीबार आणि खंडणी अनेक प्रकरणांमध्ये आरोपी करण्यात आलेल्या आरपीआयचे जिल्हाध्यक्ष व पीएल ग्रुपचे सूत्रधार प्रकाश लोंढे आणि त्यांचा पुत्र दीपक लोंढे, भूषण लोंढे यांना नाशिक पोलिसांनी जबर दणका दिला. या दोघांसह त्यांच्या साथीदारांवर मकोका कायद्यांन्वये कारवाई करण्यात आली आहे.
या सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांना अडवून लूटमार करणे, धमकावणे, दुकानदारांकडून हप्ते मागणे, हप्ते न दिल्यास मारहाण, गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, जमिनीचा ताबा देण्यासाठी खंडणी मागणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे लोंढे यांच्यावर आहेत.
मकोका कायद्यांतर्गत जामिनाची तरतूद नाही तसेच पोलिस संशयित आरोपींच्या मालमत्तेवर टाच आणू शकतात.
लोंढे पिता-पुत्रांसह पीएल ग्रुपच्या सदस्यांनी संघटितपणे विविध गुन्हे केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. हे सर्व संशयित गुन्हेगार न्यायालयीन कोठडीत असून प्रकाश लोंढे यांचे सातपूरमधील अतिक्रमित बहुमजली कार्यालय मनपा व पोलिस प्रशासनाने जमीनदोस्त केले होते. त्यानंतर आता या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्याने टोळीला दुसरा मोठा दणका बसला आहे. त्यामुळे गुन्हेगारांना जरब बसणार असून लोंढे टोळीनंतर पोलिसांचे लक्ष आता बागुल टोळीवर असेल.
या १७ जणांवर मकोका अंतर्गत कारवाई:
टोळीचा सूत्रधार प्रकाश लोंढे ऊर्फ बॉस, सदस्य शुभम ऊर्फ भुऱ्या राजू पाटील, दुर्गेश संतोष वाघमारे, आकाश ऊर्फ अभिजित राजू अडांगळे, दीपक ऊर्फ नानाजी प्रकाश लोंढे संतोष शेट्टी पवार ऊर्फ जल्लाद, अमोल बाबासाहेब पगारे, देवेश गजानन शेरताठे, शुभम रामगिर गोसावी, सनी ऊर्फ ललित अशोक विठ्ठलकर, भूषण प्रकाश लोंढे ऊर्फ भाईजी, प्रिंस चित्रसेन सिंग, शुभम चंद्रकांत निकम, वेदांत संजय चाळगे, राहुल सत्यविजय गायकवाड, निखिल मधुकर निकुंभ, संदीप रमेश गांगुर्डे.
![]()

