नाशिक: आठवीच्या अपहृत विद्यार्थ्याचा खून; वडीवऱ्हे येथे आढळला मृतदेह

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाची कुरापत काढून चार ते पाच जणांच्या टोळक्याने एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्यास बेदम मारहाण केली. यानंतर त्याचा खून केल्याचा प्रकार रविवारी (दि.२६) उघडकीस आला. याप्रकरणी अंबड पोलिसांनी चौघा संशयितांना तात्काळ ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम अंबड पोलिस ठाण्यात सुरू होते. राजा गब्बर सिंग (१६ रा. “स्वामीनगर, अंबड) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.

शुक्रवार (दि. २४) नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास मयत राजा सिंग याचे संशयितांसोबत दत्तनगर येथे भांडण होऊन हाणामारी झाली होती. भांडणाचा राग मनात ठेवत चार ते पाच जणांच्या टोळीने सिंग याचे शनिवारी (दि.२५) रात्री अंबड गावातून अपहरण केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याला विल्होळी येथील एका स्टोन खडी क्रशरजवळ उचलून नेले व त्या ठिकाणी त्या बेदम मारहाण केली.

हे ही वाचा:  नाशिक: भरधाव सिमेंट मिक्सरची धडक; दुचाकीस्वार ठार

या मारहाणीत सिंगचा मृत्यू झाला. तो मयत झाल्याचे हल्लेखोरांना लक्षात येताच त्यांनी त्याचा मृतदेह तेथून उचलून राजुरबहुला परिसरातील एका निर्जन भागात नेऊन टाकला होता.

यानंतर एमआयडीसी पोलिस स्टोन खडी क्रशरजवळ उचलून नेले व त्या ठिकाणी त्या बेदम मारहाण केली. या मारहाणीत सिंगचा मृत्यू झाला. तो मयत झाल्याचे हल्लेखोरांना लक्षात येताच त्यांनी त्याचा मृतदेह तेथून उचलून राजुरबहुला परिसरातील एका निर्जन भागात नेऊन टाकला होता.

हे ही वाचा:  नाशिक: अमेरिकन नागरिकांना गंडा घालणाऱ्या संशयितांना कोठडी

यानंतर एमआयडीसी पोलिस चौकीचे पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप पवार व पोलिस नाईक जनार्दन ढाकणे यांनी तपास चक्रे फिरवत राजा सिंगचा खून करणाऱ्या चौघा संशयितांना ताब्यात घेतले. यातील अजून काही संशयित फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.

सिंग हा अंबड येथील शाळेत आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याचे वडील एका कंपनीत रोजंदारीने मजूर म्हणून काम करतात. राजा हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक वसंत खतेले हे करीत आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: शेतकरी व पाणीवापर संस्थांनी उन्हाळ हंगामासाठी 5 मार्चपर्यंत पर्यंत पाणी अर्ज सादर करावेत

अपहरणाचा गुन्हा झाला होता दाखल:
राजा सिंग हा रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याचे वडील गब्बर परशुराम सिंग (४२ रा. स्वामीनगर यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली होती. यावरून पोलिसांनी रविवारी सकाळी अपहरणाचा गुन्हा दाखल केला व त्याचा शोध सुरू केला. दरम्यान, वाडीवहे पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका निर्जन भागात मृतदेह आढळल्याचे पोलिसांना समजले. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शहानिशा केली असता अपहृत राजा सिंग याचा हा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790