नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोड येथील मालधक्का रोडवर कामगाराला मारहाण करीत त्याच्या मालकाने दरमहा दोन लाखांचा हप्ता देण्यासाठी शिवीगाल करीत मारहाण केली. संशयिताने हत्याराने मारून दुखापतही केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल केला असून, पोलिसांचा शोध घेत आहेत.
सूरज शाम कदम, अशोक राजू गौंड, आदी संतोष आढाव (सर्व रा. गुलाबवाडी, देवळाली गाव) असे संशयितांची नावे आहेत. सिद्धार्थ खंडू आढाव (२६, रा. रमाबाई आंबेडकर नगर, गुलाबवाडी) यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (ता. २५) सायंकाळी साडेसातच्या सुमारास संशयितांनी सिद्धार्थ यास आनंद ट्रान्सपोर्ट कंपनी येथे झालेल्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ केली.
तसेच, तुझा मालक अमित कलंत्री हा दररोज आम्हाला एक हजार रुपये किंवा दरमहा दोन लाख रुपयांचा हप्ता कसा देत नाही, असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, आदी आढाव याने त्याच्याकडली कोयत्याने मारून दुखापत केली आणि तुझ्याकडे नंतर बघतो म्हणून दम दिला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (नाशिकरोड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ४६/२०२५)
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790