नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिकरोड (प्रतिनिधी): सुमारे एक लाख रुपये किमतीचे मेफेड्रॉन विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगताना मिळून आलेल्या एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे मेफेड्रॉन हस्तगत करण्यात आले आहे.
याबाबत पोलीस हवालदार गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की संशयित आरोपी सागर रामदास शिंदे (वय ३०, रा. पिंपळपट्टी रोड, जेलरोड, नाशिकरोड) हा काल सायंकाळी सात वाजेच्या सुमारास भगवती लॉन्सकडून पंचक गावाकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर काही जण मेफेड्रॉन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सापळा रचला.
त्या ठिकाणी हा संशयित आरोपी १ लाख ६ हजार ५५० रुपये किमतीचा मेफेड्रॉन हा अमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःजवळ बाळगताना मिळून आला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्याकडून मॅफेड्रॉन अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहे.