नाशिक: बंद वाहन दुरुस्त करण्यास नकार दिल्याने मद्यधुंद टोळक्याची गॅरेजचालकास मारहाण

नाशिक (प्रतिनिधी): बंद वाहन दुरुस्त करण्यास नकार दिल्याने चौघांनी एका गॅरेजवाल्यास मारहाण केल्याची घटना पाथर्डी गाव परिसरात घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की संशयित सर्फराज रफिक शेख (वय 22, रा. इंदिरा गांधी वसाहत क्रमांक 2, लेखानगर, सिडको), तुषार संजय नेले (वय 19, रा. ढोले कॉलनीमागे, सिडको), राहुल भारत गवारे (वय 23, रा. शिवाजी चौक, सिडको) व विसंबा सनी राजू आठवले (वय 17, रा. इंदिरा गांधी वसाहत क्रमांक 1, लेखानगर, सिडको) हे चौघे गौळाणे परिसरात 22 सप्टेंबर रोजी पार्टी करण्यासाठी गेले होते. या पार्टीदरम्यान त्यांनी मद्यपानही केले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गॅस सिलिंडरसाठी धडपड; पुरेसा साठा असल्याचा प्रशासनाचा दावा…

पार्टी करून परत येताना पाथर्डी फाट्याजवळ त्यांची गाडी बंद पडली. त्यांनी धक्का मारत पाथर्डी गाव, पाथर्डी सर्कल येथील चाँद टायर पंक्चर या दुकानात गाडी दुरुस्तीसाठी आणली.

या दुकानाचा चालक कौसर आलम ज्ञानमहंमद अली (वय 24) याने त्यांचे वाहन दुरुस्त करण्यास नकार दिला. या गोष्टीचा राग आल्याने चौघांनी त्याला शिवीगाळ, मारहाण व दमदाटी करीत दगडाने व हत्याराने दुखापत केली.

🔎 हे वाचलं का?:  येत्या 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

या प्रकरणी कौसर अलम ज्ञानमहंमद अली यांच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790