नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): क्रिप्टोकरन्सीच्या ट्रेडिंगमध्ये जास्तीच्या परताव्याचे आमिष दाखवून नाशिक शहरातील एका महिलेची तब्ब्ल २४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
या महिलेस गुंतवणुकीचा टास्क देवून तब्बल २४ लाखास लुबाडले. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या फसवणूक प्रकरणी या महिलेने तक्रार दाखल केली आहे. सदर महिलेने गेल्या सप्टेंबर महिन्यात इंटरनेटवर घरबसल्या कामाचा शोध घेत असतांना टेलीग्राम आयडीच्या माध्यमातून भामट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी संशयितांनी क्रिप्टोकरन्सी मध्ये ट्रेंडिग केल्यास जास्तीचा परवा मिळेल असे आमिष दाखवून हा गंडा घातला.
संशयितांनी पैसे करन्सीमध्ये ट्रेडिंग करीत असल्याचे भासविल्याने महिलेने २१ ते ३० सप्टेंबर दरम्यान तब्बल २४ लाख रूपये टेलिग्राम आयडी धारकाच्या बॅक खात्यात भरले. मात्र कालांतराने टाळाटाळ करीत संशयिताने संपर्क तोडल्याने महिलेने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक शेख करीत आहेत.