🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: हुंड्यासाठी छळ; नवविवाहितेची आत्महत्या, हुंडाबळीचा गुन्हा दाखल

नाशिक। दि. २४ ऑगस्ट २०२५: ‘लग्नात हुंडा दिला नाही, माहेरच्यांकडून सात लाख रुपये आणून दे…’ असा तगादा लावत सासरच्यांकडून नवविवाहितेचा सतत शारीरिक-मानसिक छळ केला जात होता. या छळाला कंटाळून पीडित विवाहिता नंदिनी सुरज चौहान (२२, रा. आनंदनगर, पाथर्डीफाटा) यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 27 फेब्रुवारीपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

याप्रकरणी पती, सासू, जेठ, जेठानी यांच्याविरूद्ध हुंडाबळीचा गुन्हा इंदिरानगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. नवविवाहितेचे वडील संदीपकुमार चौहान (रा. मेहडा, उत्तरप्रदेश) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी नंदिनी हिचा विवाह २०२४ साली एप्रिल महिन्यात सुरज ग्यानी चौहान यांच्याशी झाला होता.

सुरज नाशिकमध्ये खासगी कंपनीत नोकरीस असल्याने लग्नानंतर काही दिवसांनी तिला नाशिक येथे आणले होते. सासू, पती, जेठ-जेठानी यांनी ‘लग्नात हुंडा दिला नाही, माहेराहून सात लाख रुपये आण’ असा सतत तगादा लावला होता. त्याचप्रमाणे तिला सातत्याने मारझोड केली जात असल्यासाचे फिर्यादीत म्हटले आहे. संशयित सुरज दारूच्या नशेत तिला मारहाण करत होता, असा आरोप करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मुलगी झाल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ; सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा

२० ऑगस्ट रोजी राहत्या घरात नंदिनीने गळफास घेतला होता. संशयित कुमारी देवी चौहान, पती सूरज चौहान, जेठ सतीश चौहान व जेठाणी किरण चौहान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (इंदिरानगर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: २६७/२०२५) पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोनार करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790