नाशिक: एटीएम कार्डची अदलाबदल करत ५५ हजार परस्पर काढले

नाशिक (प्रतिनिधी): एटीएम कार्ड बदलून एका व्यक्तीच्या बँक खात्यावरील ५५ हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचा आणि ते चोरून नेल्याचा प्रकार अशोकनगर येथे उघडकीस आला आहे.

याप्रकरणी निगळ (रा. सातपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते सायंकाळच्या सुमारास अशोकनगर येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले. यावेळी तेथे उभ्या दोघा अनोळखी व्यक्तींपैकी एकाने हातचलाखीने फिर्यादीचे बँक ऑफ बडोदाचे एटीएम कार्ड बदलून घेतले.

👉 हे ही वाचा:  नाशिक: घर नावावर करण्यासाठी दिराकडून विनयभंग; जावेचाही सहभाग

यानंतर त्यांच्या बँक खात्यातून या एटीएमद्वारे टप्याटप्याने एकूण ५५ हजार रुपये काढून घेत पोबारा केला. बँक खात्यातून पैसे गेल्याचे समजल्यावर निगळ यांनी सातपूर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार देण्यात आली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सातपूर पोलिस ठाण्याचे हवालदार सूर्यवंशी करत आहेत. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ११८/२०२५)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790