🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी २० लाख रुपयांची मागणी करत विवाहितेचा छळ

नाशिक। दि. २३ जुलै २०२५: सावकाराकडून घेतलेले २० लाखांचे कर्ज फेडण्याकरीता माहेरहून पैसे आणावे, असा तगादा लावत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी कल्याण येथील पती, सासू, सासरे व नणंदेविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पोलीस असल्याची बतावणी करत नागरिकांना लुटणाऱ्या इराणीला अटक; १८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत !

पीडित विवाहीतेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचे २०२० मध्ये लग्न झाले आहे. लग्नाच्या काही दिवसांत पतीने तू आमच्या लायकीची नाही, असे हिणवत, उपाशी ठेवत शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच आमच्यावर स्थानिक सावकाराचे १५ ते २० लाख कर्ज आहे. ते फेडण्याकरीता माहेरहून पैसे घेऊन ये, अशी कुरापत काढून छळ केला. याप्रकरणी पती, सासू, नणंद यांच्याविरोधात उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790