नाशिक: गुटखा साठेबाज जेरबंद; ६५ हजारांचा माल जप्त

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): शहरात गुटख्याची विक्री सुरूच असून अन्न व औषध प्रशासनाने पेठरोड भागात टाकलेल्या छाप्यात ६५ हजार रूपये किमतीचा पानमसाला व सुगंधी तंबाखूचा साठा हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी एकास बेड्या ठोकण्यात आल्या असून हा साठा विक्रीसाठी साठवणुक करण्यात आला होता. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: खुनातील संशयित 14 महिन्यांनंतर ताब्यात; सिडकोतील 'या' मृत्यूप्रकरणाचा उलगडा !

जतेश महेंद्रभाई ठक्कर (रा. शिवछाया सोसा.पेठरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत एफडीएचे अधिकारी अमित रासकर यांनी फिर्याद दिली आहे. शिवछाया सोसायटीत बेकायदा गुटख्याचा साठा करून ठेवण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनास मिळाली होती.

त्यानुसार पथकाने शुक्रवारी (दि. २१) सकाळी छापा टाकला असता फ्लॅट नं. डी १०३ मध्ये वेगवेगळ्या कंपनीचे पानमसाला व सुगंधी तंबाखू (गुटखा)असा सुमारे ६५ हजार ३३५ रूपयांचा साठा आढळून आला. याबाबत ठक्कर यास बेड्या ठोकत पथकाने मुद्देमाल हस्तगत केला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३७८/२०२४)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790