नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): फ्लॅट विकायचे असेल तर दहा लाखांची खंडणी द्यावी लागेल, अशी धमकी दिल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत नाशिकरोड पोलिसांनी दिलेली माहिती व बांधकाम व्यावसायिक प्रमोद बाळकृष्ण गोरे (५५, रा. प्रकाशनगर, शिखरेवाडी) यांच्या तक्रारीनुसार २१ एप्रिलला दुपारी दोन वाजता गोरे हे त्यांच्या मालधक्का रोड, नुरी मस्जिद, नाशिकरोड येथे इमारत बांधकाम प्रकल्पाच्या ऑफिसमध्ये बसले असताना त्यांच्या ओळखीचे संशयित किशोर भारती याने तिथे येऊन मला दहा लाख रुपये दे, नाही तर मी तुला येथील एकही फ्लॅट विकू देणार नाही, असे बोलत तुझी ही साईट बंद करून टाकेल, अशी धमकी दिली.
त्यानंतर पुन्हा सांयकाळी भारतीने मालधक्का आमचा आहे, असे म्हणत धमकी देत १० लाखांची मागणी करून तुला बघून घेईल व शिवीगाळ केली. पोलिसांनी या प्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: २३३/२०२४)