🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: बिल्डर नरेश कारडांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

नाशिक। दि. २१ फेब्रुवारी २०२६: नाशिकरोड परिसरातील अनुराधा कॉम्प्लेक्समध्ये दुकान उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत ३० लाख रुपयांची रक्कम स्वीकारून फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांच्याविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  शुक्रवारपासून दहावीची परीक्षा

अनुराधा थिएटरच्या जागेवर व्यावसायिक मॉल उभारण्याचा प्रकल्प जाहीर करण्यात आला होता. या प्रकल्पामध्ये दुकान क्रमांक १० देण्याचे तसेच गुंतवणूक रकमेवर वार्षिक २१ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत कारडा यांनी दिनेश दातवानी यांच्याकडून ३० लाख रुपये स्वीकारल्याची तक्रार आहे.

मात्र प्रत्यक्षात संबंधित ठिकाणी मॉलचे कोणतेही बांधकाम सुरू नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर दातवानी यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी कारडा यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 27 फेब्रुवारीपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

गुंतवणुकीच्या नावाखाली घेतलेल्या रकमेचा गैरवापर केल्याचा आरोप असून, या प्रकरणी पुढील तपास नाशिकरोड पोलीस करीत आहेत. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: १५१/२०२६)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790