नाशिक: ‘या’ दोन नामांकित बिल्डर्स विरोधात महिलेच्या तक्रारीवरुन फसवणूकीचा गुन्हा दाखल

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): फ्लॅटचा ताबा न दिल्याने नामांकित बिल्डर विरोधात महिला ग्राहकाने पोलिसात स्थानकात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आठ वर्षापूर्वी ठरलेल्या व्यवहारात रक्कम अदा करूनही फ्लॅटचा ताबा न दिल्याने महिलेने पोलिस स्थानकात धाव घेतली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्यास पाच तासांत अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित दिलीप संकलेचा व पुनीत संकलेचा अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित बांधकाम व्यावसायिकांची नावे आहेत. संशयितांची श्री संकलेचा बिल्डर्स नावाची फर्म आहे. याप्रकरणी रिना संतोष पांडे (रा. मनमाड ता.नांदगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. पांडे यांनी सन.२०१६ मध्ये संशयितांच्या वॉटरवेज या साईडमध्ये फ्लॅट बुक केला होता.

⚡ हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात पुढील तीन दिवस तीव्र थंडीची शक्यता

फ्लॅट क्र. ४०२ ही सदनिका पसंत करीत पांडे यांनी या व्यवहारापोटी ठरलेली २८ लाख ४२ हजार ७०० रूपयांची रोकड अदा करूनही इमारतीचे बांधकाम पूर्ण केले नाही. तसेच फ्लॅटचा ताबाही दिला नाही.

गेली आठ वर्ष पाठपुरावा करूनही बिल्डरकडून दखल घेतली जात नसल्याने पांडे यांनी पोलिसात धाव घेतली असून याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (भद्रकाली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक: ०३५७/२०२३, भारतीय दंड विधान: ४२०, ४०६, ३४). या गुन्ह्याबाबत अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सोनवणे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790

here