नाशिक: सीबीएसला प्रवाशांचे दागिने चोरणारी महिला गजाआड! सव्वा लाखांचे दागिने हस्तगत

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): जुने मध्यवर्ती बसस्थानक येथे गर्दीचा फायदा घेत महिला प्रवाशांच्या गळ्यातील व पिशवीतील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. संशयित महिला मराठवाड्यातील असून, तिच्याकडून तीन महिलांचे चोरलेले सुमारे सव्वा लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

हे ही वाचा:  नाशिक:  'स्टॉप-सर्च' कारवाईत यश: दुचाकी चोरणारा सराईत पोलिसांच्या तावडीत !

वर्षा शंकर भोसले (रा. हसनाबाद, सिल्लोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे.

चंदा अनिल आहेर (वय: ६५, रा. हेडगेवार चौक, सिडको) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या रविवारी (ता. १७) सकाळी साडेदहाच्या सुमारास कळवणला जाण्यासाठी पतीसमवेत जुने सीबीएस येथे आल्या होत्या.

त्यावेळी बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपयांची सोन्याचे मंगळसूत्र हातचलाखीने ओढले असता, त्याची जाणीव चंदा आहेर यांना झाल्याने त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे सावध झालेल्या नागरिकांनी संशयित वर्षा हिला पकडले. बसस्थानक परिसरातच गस्तीवरील पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

हे ही वाचा:  नाशिक: पुढील पाच दिवस राज्यातील तापमानात होणार अंशतः वाढ

त्यानुसार पोलिसांनी तिचा ताबा घेत चौकशी केली असता, तिने त्याच बसमधील आणखी दोन महिलांच्या सोन्याच्या दागिण्यांवर डल्ला मारल्याचे समोर आले. शितल शरद न्याहारकर यांचे १५ हजारांचे मंगळसूत्र व उज्ज्वला केदा बस्ते (रा. गणोरे) यांचे ७० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र तिने चोरल्याची कबुली दिली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जाधव हे तपास करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790