नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): अवैध सावकारी करत कोट्यवधींची मालमत्ता जमवलेल्या वैभव देवरेच्या अवैध सावकारीची व्याप्ती वाढतच असून देवरेच्या विरोधात अनेकांनी पोलिसांत अर्ज दिले आहे. एकंदरीत या गुन्ह्याची व्याप्ती वाढली असून तपासाकरीता एसआयटी पथक स्थापन करण्यात आले आहे.
पोलिसांनी याबाबत दिलेली माहिती अशी, देवरे विरोधात ३ गुन्हे दाखल इतर तक्रारदारांचे जबाब घेण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तपासाकरिता स्वतंत्र तपासी पथक स्थापन करण्याचे आदेश दिले
आहेत. या पथकात गुन्हे शाखा, सायबर, आर्थिक आणि इंदिरानगर पोलिस ठाण्याचे अधिकारी आहेत. या अधिकाऱ्यांनी देवरेच्या निकटवर्तीय नातेवाइकांच्या घरी चौकशी केली. देवरेच्या घराजवळील उद्यानात ठेवलेली पाच वाहने कर्जदारांची ओढून आणलेली वाहने असल्याचे समोर आले आहे. देवरेच्या घरातून पोलिसांनी मातमत्तासंबंधी कागदपत्रे जप्त केली आहेत. या मध्ये कोट्यवधीची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. उपआयुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ निरीक्षक अशोक शेरमाळे तपास करत आहे.