नाशिक: एटीएम केंद्रात डेबिट कार्ड बदलून महिला शिक्षिकेला ३० हजारांना गंडा

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): दिंडोरी रोडवरील अॅक्सिस बँकेच्या एटीएम केंद्रात रोकड काढण्यासाठी आलेल्या महिला शिक्षिकेच्या हातातून डेबिट कार्ड अदलाबदल करत पासवर्ड चोरून बघत तीस हजार रुपयांची रोकड काढून घेत फसवणूक केल्याची घटना घडली.

बुधवारी (दि.१२) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दिंडोरी रोडवरील विनायकनगर येथे राहणाऱ्या अनुसया निंबा चव्हाण (५५) या दिंडोरी रोडवरील अॅक्सिस बँकेच्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी दोघा संशयितांनी त्यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांचा पासवर्ड बघून डेबिट कार्डची अदलाबदल करून घेत रोकड लांबविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

⚡ हे ही वाचा:  महामार्गांवरील ‘नो नेटवर्क’ची समस्या लवकरच सुटणार; ४२४ ब्लॅक स्पॉट्स चिन्हांकित !

त्यांच्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलिस ठाण्यात अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास म्हसरूळ पोलिस करत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790