नाशिक (प्रतिनिधी): आयआरसीटीसी रेल्वे कंपनीत चांगल्या पदावर नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून बनावट नियुक्तिपत्र व ओळखपत्र दाखवत १६ लाख पंधरा हजार तीनशे रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी योगेश वसंत मोरे यांच्याविरुद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय ठिगळे थिगळे (६८ फ्लॅट नंबर ४ चैत्र मधुरा आपार्टमेंट मोजकेश्वर कॉलनी) यांची २०२० मध्ये योगेश वसंतराव मोरे (कुसुम प्रेम अपार्टमेंट सहदेवनगर, गंगापूररोड) यांच्याशी ओळख झाली. मोरे यांनी आपली उच्चपदस्थ व्यक्तींशी ओळख असून, त्याच्यामार्फत गरजू व्यक्तींना पैसे घेऊन नोकरी लावून देतो, असे सांगितले.
दाखविल्या बनावट नियुक्ती ऑर्डर:
मोबाइलमधील कागदपत्र व शासकीय नोकरीतील नियुक्ती ऑर्डर दाखविल्या. सध्या कोरोनाकाळ असून, सर्व प्रकारच्या रिक्त जागा मॅनेजमेंट कोट्यातून भरल्या जात असल्याचे थिगळे यांना सांगून नोकरीसाठी १६ लाख पंधरा हजार तीनशे रुपये घेतले. वर्ष होऊन सुद्धा मुलाला नोकरी लावून दिली नाही. तसेच पैसेही परत केले नाही. म्हणून थिगळे यांनी पोलिस ठाणे गाठले. त्यांच्या फिर्यादीवरून योगेश वसंत मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ११०/२०२४)