नाशिक। दि. १२ डिसेंबर २०२५: चारित्र्याच्या संशयावरून मद्यधुंद अवस्थेत नवऱ्याने लेसच्या साहाय्याने बायकोचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.११) घडली. संशयित नितीन उत्तम भामरे हा फरार झाला असून, पंचवटी पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
ढिकले वाचनालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर भामरे दाम्पत्य हे कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. गुरुवारी दोघांमध्ये मद्यपी नितीनने लेसच्या साहाय्याने त्याची बायको शीतल भामरे हिचा गळा आवळून ठार मारल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने दरवाजाला कुलूप लावून घेत घरातून पलायन केले.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, संतोष जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. संशयित नितीनविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
![]()


