news

नाशिक: डॉ. मनीषा जेजूरकर आत्महत्याप्रकरणी पती डॉ. नीलेश जेजूरकर यांच्यावर गुन्हा दाखल

नाशिक। दि. १० मार्च २०२६: शहरातील डि. के. नगर परिसरात घडलेल्या डॉ. मनीषा जेजूरकर (४०) यांच्या आत्महत्येप्रकरणी अखेर त्यांच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नीलेश जेजूरकर (४४, रा. डि. के. नगर, गंगापूर रोड) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक : तापमानाचा पारा वाढला; वाऱ्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा

शुक्रवारी (दि. ६) गंगापूर रोडवरील डि. के. नगर येथील त्यांच्या राहत्या फ्लॅटमध्ये खिडकीला गळफास घेऊन डॉ. मनीषा जेजूरकर यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

या प्रकरणी रोहिणी थोरात (रा. हिरावाडी, पंचवटी) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, त्या एकलहरे येथे नोकरीवर असताना दुपारी सुमारे १२.३० वाजता भाऊ गौरव याचा फोन आला व बहिण मनीषा हिने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्या तातडीने गंगापूर रोड येथील घरी पोहोचल्या असता मनीषा बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या दिसून आल्या. त्यानंतर भावासह पतीच्या मदतीने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यांकन चाचणी (FLNAT) 15 मार्च रोजी

डॉ. निलेश जेजूरकर यांच्या सोबत काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरच्या सांगण्यावरून संशयित आरोपी डॉ. नीलेश हे पत्नी डॉ. मनीषा यांना मानसिक त्रास देत होते, अशी फिर्याद मनीषा जेजूरकर यांची बहीण रोहिणी थोरात यांनी दिली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास गंगापूर पोलीस करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790