नाशिक। दि. ०८ ऑगस्ट २०२५: प्रेयसीला लग्नाचे आमिष देत तिच्यावर शहरातील स्पा सेंटर, हॉटेल, फ्लॅटमध्ये नेऊन शारीरिक संबंध ठेवून गर्भवती केले. लग्नाबाबत विचारणा केली असता बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडून जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. भीमसिंग कबीर नायक (रा. वाशी, नवी मुंबई) असे या संशयिताचे नाव आहे. संशयिताच्या विरोधात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार, २०२१ पासून संशयित भीमसिंग नायकसोबत प्रेमसंबंध आहे. संशयिताने लग्नाचे आमिष देत शहरातील स्पा सेंटर, हॉटेल, लॉज आणि मित्राच्या फ्लॅटवर शारीरिक संबंध ठेवत युवतीला गर्भवती केले.
गर्भवती असल्याचे समजल्यानंतर संशयिताने तू आमच्या जातीची नाही, आपल्या दोघांचे लग्न कुटुंबियांना मान्य होणार नाही, असे बोलून लग्नास नकार दिला. बळजबरीने गर्भपात केला. लग्न करण्यास विनंती करत तगादा लावला असता संशयिताने जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. सहायक आयुक्त सचिन बारी तपास करत आहे. (उपनगर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३४०/२०२५)