नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): बँकेतून बोलत असल्याचे सांगत क्रेडिट कार्डची सर्व माहिती घेत एकाला सुमारे साडेआठ लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकरोड येथील मुक्तीधाम पाठीमागे राहणाऱ्या बाळासाहेब जाधव यांच्यासोबत जुलै ते नोव्हेंबर दरम्यान हा प्रकार घडला आहे. क्रेडिट कार्डची माहिती मिळवत सायबर भामट्यांनी तब्बल साडेआठ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. जाधव यांच्यासह शहरातील दोघांना जुलै महिन्यात भामट्यांनी संपर्क साधला होता. आयसीआयसीआय आणि एसबीआय बँकेतून बोलत असल्याचे भासवून भामट्यांनी क्रेडिट कार्ड अॅक्टिव्ह करण्याचा बहाणा केला.
सायबर भामट्यांनी दाखविलेल्या विश्वासास बळी पडलेल्या तिघांनीही आपल्या क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती दिल्याने ही फसवणूक झाली.