नाशिक: रिलेशनमध्ये राहण्यासाठी युवतीचे अपहरण करत घाटात ढकलून देण्याची धमकी

नाशिक (प्रतिनिधी): क्लासच्या खाली उभ्या असलेल्या युवतीचे अपहरण करत तिला घाटात ढकलून देण्याची धमकी देत रिलेशनमध्ये न राहिल्यास आत्महत्या करण्याची धमकी देणाऱ्या संशयिताच्या विरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सनी हटवाल (रा. बागवानपुरा) असे या संशयिताचे नाव आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्या (दि. २६) विविध कार्यक्रमांचे आयोजन

पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार, खासगी क्लासच्या खाली उभी असताना संशयित सनीने क्लास संपल्यानंतर तुझ्याकडे बघतो अशी धमकी दिली. युवतीने भीतीपोटी मैत्रिणीच्या भावाला फोन करून बोलावून घेतले. या तरुणाने तू का त्रास देतो असे समजावत असताना युवतीच्या हातातील मोबाइल हिसकावत संशयित निघून गेला. फोन परत करण्याचा बहाणा करत कॉलेजरोड येथे युवतीला बोलावले. बळजबरीने कारमध्ये बसवून गंगापूरच्या दिशेने घेऊन गेला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चोरीच्या पाच मोटारसायकलींसह आरोपी अटकेत; पाच गुन्हे उघडकीस

‘माझ्यासोबत रिलेशनमध्ये रहा, नाही तर तुला घाटात फेकून देईल. तू कुणाला सांगितले तर मी आत्महत्या करेन’ अशी धमकी दिली. युवतीने प्रसंगावधान राखत त्याला होकार देत सुटका केली. यापूर्वीसुद्धा रिलेशनमध्ये राहण्यास नकार दिल्याने संशयिताने मारहाण केल्याची तक्रार युवतीने दिली. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: २४०/२०२४)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790