नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मखमलाबाद परिसरात असलेल्या चहा टपरीवर चोरीचे सोने विक्रीसाठी आलेल्या दोघा संशयितांना म्हसरूळ पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे.
ताब्यात घेतलेल्या संशयितांत एका विधि संघर्षित बालकाचा देखील समावेश असून पोलिसांनी संशयित आरोपींकडून एक आलिशान कार, मोबाईल व सोन्याची लगड असा दोन लाख नऊ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. मखमलाबाद शिवारातील विद्यानगर परिसरात राहणारा संशयित आरोपी प्रीतेश ऊर्फ विशाल तानाजी शिंगाडे हा त्याच्या विधि संघर्षित साथीदारासह एका आलिशान कारमधून मखमलाबादजवळ चहा टपरीवर चोरीचे सोने विक्री करण्यासाठी येत
असल्याची माहिती निरीक्षक प्रशांत यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळाली. ही माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष ढवळे यांना कळविल्यानंतर ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार देवराम चव्हाण, यु, एम. हाके, सतीश वसावे, बाळासाहेब मुर्तडक, प्रशांत वालझाडे, प्रशांत देवरे, पंकज चव्हाण, पंकज महाले, काशिनाथ मांदळे, गिरिधर भुसारे, जितू शिंदे, गुणवंत गायकवाड आदींनी सापळा रचून मिळालेल्या वर्णनावरून संशयितांना चारचाकी कारसह ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्यांची चौकशी करत अंगझडती घेतली असता त्यांनी हे सोने परिसरात चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडून एक मोबाईल, सोन्याची लगड आणि कार असा ऐवज जप्त केला आहे,