नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): आज सातपूर येथे एका १९ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या झाल्याने नाशिक शहर पुन्हा एकदा हादरलं आहे.
सातपूर परिसरातील गुलमोहर कॉलनी येथील कौशल्य व्हिला फ्लॅट नंबर एक या बिल्डिंगमध्ये राहणारा 19 वर्षीय युवक महेंद्र सिंग याची धारदार शस्त्राने वार करत हत्या केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.
हा युवक नेपाळ येथील राहणारा असुन तो कामगारनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या युवकाची हत्या कोणत्या कारणातून झाली हे अद्याप समोर आलेले नसून त्याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
या घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे, शेखर देशमुख, अंबड विभाग तसेच सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.