नाशिक (प्रतिनिधी): शहरात दुचाकी चोरांची हिंमत दिवसेंदिवस वाढतच असून, गुरुवारी (दि. २७) एकाच दिवसात सहा दुचाकींची विविध भागातून चोरी झाल्याची नोंद विविध पोलिस ठाण्यांमध्ये करण्यात आली आहे.
तपोवन येथील साईबाबा मंदिराजवळ कैलास पिठे (३२) यांची काळ्या रंगाची दुचाकी (एमएच १५-ईआर ५९९१) हॅण्डल लॉक करून उभी ठेवली होती. ती चोरीस गेली. गंगापूर पोलिस ठाणे हद्दीत दुचाकी चोरीची दुसरी घटना घडली. संजय जयराम बोडके (३८) जेहान सर्कल येथे कामानिमित्त आले होते. त्यांची दुचाकी (एमएच १५-सीझेड ७१६१) चोरी झाली.
सातपूर येथील महिंद्रा कंपनीच्या गेटसमोर रामेश्वर मुकुंददास बैरागी (२६) यांची वीस हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच १५-जीजी ३५९०) चोरीस गेली. संतोष रामकृष्ण वड (२९) यांची ५० हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच १५-जीवाय ८३९९) चोरून नेली. अशाच प्रकार आणखी दोन दुचाकी चोरीच्या घटना घडल्या.
![]()


