नाशिक: नायलॉन मांजा विक्री करणारा संशयित ताब्यात

नाशिक (प्रतिनिधी): मुंबई पोलिसांनी रॉयल कॉलनी येथे नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या संशयिताला ताब्यात घेतले. समीर सलीम शेख (रा. वडाळागाव) असे या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून १३ हजारांचा मांजा जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पथकाचे अमलदार गणेश बोरणारे यांना माहिती मिळाली. रॉयल कॉलनी येथे इमारतीच्या जवळ एक इसम मांजा विक्री करत आहे. पथकाने सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडे मांजाचे २२ गट्टू मिळून आले. वरिष्ठ निरीक्षक संतोष नरुटे, सतीश शिरसाठ, रोहिदास सोनार यांच्या पथकाने ही कारवाई केली. संशयिताकडून छुप्या पद्धतीने मांजा विक्री केली जात होती.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: नवीन घाटांची कामे जानेवारी अखेर पूर्ण करावीत- पालक सचिव एकनाथ डवले
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790