नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): चाडेगाव यात्रौत्सवात आयोजकांकडे खंडणीची मागणी करत गोळीबार करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा संशयित सचिन मानकर यास अटक करण्यात आली. गुंडाविरोधी पथकाने पाथर्डी गाव येथे ही कारवाई केली.
गुन्हा घडल्यापासून चार महिने तो फरार होता. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, २४ एप्रिलला ज्ञानेश्वर मानकर यांना चाडेगाव येथील हॉटेलमध्ये रात्री बोलावत संशयित सचिन मानकर व त्याच्या साथीदारांनी २० हजारांच्या खंडणीची मागणी केली होती. पैसे देण्यास नकार दिला असता संशयित सचिन मानकरने गावठी कट्टा काढून दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी पाठीत घुसली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790