
नाशिक (प्रतिनिधी): मोबाइल, घराचे कर्ज फेडण्यासाठी एकाने मित्राच्याच घरी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. गुन्हे शाखा युनिट १ व २ ने संयुक्त कारवाई करीत चौघांना पकडून त्यांच्याकडून ३८ लाख ५८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी २५ किमी अंतरावरील सीसीटीव्ही तपासत चोरट्यांचा माग काढला. पखाल रोडवरील गुलशन कॉलनीतील रहिवासी अंजुम बिसमिल्ला कुरेशी यांच्या घरी २४ ते २६ मे दरम्यान, चोरट्याने घरफोडी करून सोने-चांदीचे दागिने व २ लाख रुपयांची रोकड असा ऐवज लंपास केला. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखा युनिट १ ने परिसरातील सीसीटीव्ही तपासत दोन त्यानुसार नावीद अल्ताफ हाशमी (२५, रा. द्वारका नगरी), शेहबाज जावेद खान (२९, रा. वडाळा रोड), उत्तम धोंडीराम मुंजे (३०, रा. पेगलवाडी, ता. त्र्यंबकेश्वर) व महेश मधुकर व्यवहारे (२७, रा. ता. त्र्यंबकेश्वर) यांची ओळख पटली.
दरम्यान, पोलिस अंमलदार आप्पा पानवळ व मुक्तार शेख यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर ते पहिने रोड दरम्यान सापळा रचण्यात आला. एमएच ०५ ईजे ४२९८ क्रमांकाच्या कारमधून पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790