
नाशिक। दि. २९ सप्टेंबर २०२५: शहरात वास्तव्य करून मोबाइल व लॅपटॉप चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरात ही कारवाई केली. रामू बलराज, सत्यवेल श्रीनिवास, आनंद नित्यानंद आणि एक अल्पवयीन (सर्व रा. चित्तूर, आंध्रप्रदेश) अशी या संशयिताची नावे आहेत. त्यांच्याकडून ५३ मोबाइल व ६ लॅपटॉप जप्त करण्यात आले.
पथकाचे नाझिम खान पठाण, संदीप भांड, विशाल काठे, अमोल कोष्टी यांना चोरीचे लॅपटॉप घेऊन काही लोक रेल्वेने चित्तूर (आंध्र प्रदेश) येथे पळून जात आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचला आणि दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत संशयितांनी मोबाइल, लॅपटॉप चोरी व लूट केल्याची कबुली दिली. संशयित ज्या ठिकाणी राहत होते त्या घराची झडती घेतली असता ५३ मोबाइल व ६ लॅपटॉप मिळून आले. एकूण ३५ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील एकूण सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक संदिप मिटके (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक/मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, हवालदार प्रविण वाघमारे, विशाल काठे, नाझीमखान पठाण, प्रदिप म्हसदे, संदिप भांड, विशाल देवरे, प्रशांत मरकड, मिलींदसिंग परदेशी, रोहिदास लिलके, महेश साळुंके, धनंजय शिंदे, उत्तम पवार, राजेश लोखंडे, अंमलदार: अमोल कोष्टी, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे, अनुजा येवले, चालक समाधान पवार यांच्या पथकाने केली.
![]()

