नाशिक: हॉटेल गोळीबार प्रकरणी लोंढे टोळीचा फरार संशयित जेरबंद

नाशिक। दि. २५ ऑक्टोबर २०२५: सातपूर येथील हॉटेल ऑरा गोळीबार प्रकरणात फरार असलेला संदीप रमेश गांगुर्डे या संशयिताला अटक करण्यात आली. अंबड गुन्हे शाखेच्या पथकाने आयटीआय सिग्नलजवळ ही कारवाई केली. जगवेंद्रसिंग राजपूत यांच्या पथकाचे भगवान जाधव, योगेश चव्हाण यांना संदीप गांगुर्डे हा निमा कार्यालयाजवळ आला असल्याचे समजले.

पथकाने परिसरात सापळा रचला. संशयिताने पथकाला बघून पलायन करण्याचा प्रयत्न केला. पथकाने सिग्नलपर्यंत पाठलाग करुन त्याला पकडले. संशयिताविरोधात खून, दरोडा, लुटमार, जिवे मारण्याच्या प्रयत्नाचे ४ गंभीर गुन्हे दाखल आहे. लोंढे टोळीचा सक्रिय सदस्य असून हॉटेल गोळीबार प्रकरणात संशयिताचा सहभाग आहे. संशयिताला सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अधिक तपास सुरू आहे.

Loading

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या सहा बांगलादेशी महिलांना अटक !
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790