
नाशिक (प्रतिनिधी): पंचवटीतील रामकुंड परिसरात महिलांच्या पर्समधून सोने चोरणारा आष्टी (ता. परतूर जि.जालना) येथील संशयित आरोपी शंकर भानुदास काळे (२१) यास भद्रकाली येथे बेड्या ठोकण्यात आल्या. चोरीच्या दोन गुन्ह्यांची कबुली त्याने दिली. त्याच्याकडून एक लाख १४ हजारांच्या १२ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या लगड हस्तगत करण्यात आल्या.
शंकर काळे हा एका सराफाकडे चोरी केलेले सोने विक्रीसाठी भद्रकालीत येत असल्याची माहिती युनिट १ चे पोलिस हेड कॉन्स्टेबल रवींद्र आढाव विलास चारोस्कर यांना खबऱ्यामार्फत मिळाली होती मिळालेल्या माहितीद्वारे सापळा रचून काळे यास बेड्या ठोकण्यात आल्या. कपालेश्वर मंदिर, सांडव्याची देवी परिसर येथून त्याने गर्दीचा फायदा घेत महिलांच्या पर्समधून सोने चोरी केली होती.
सदरची कामगिरी गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहायक पोलीस निरीक्षक हिरामण भोये, पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार रविंद्र आढाव, योगीराज गायकवाड, देविदास ठाकरे, उत्तम पवार, रोहिदास लिलके, प्रदिप म्हसदे, विशाल काठे, धनंजय शिंदे, पोअं/विलास चारोस्कर, जगेश्वर बोरसे, आप्पा पानवळ, मपोअं/अनुजा येलवे, चापोअं/समाधान पवार यांच्या पथकाने केली.