
नाशिक । दि. २३ जून २०२५: रिक्षा प्रवासात महिलांचे दागिने चोरी करणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आली. अंबड पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोरवाडी येथे ही कारवाई केली. सुनील जगन्नाथ कुमावत (रा. कुमावत नगर, मखमलाबाद रोड) असे या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून ५ लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, २ मार्च रोजी मंगला बडगुजर या दोन नातवंडांसोबत राजरत्ननगर ते मुंबई नाका असा रिक्षा प्रवास करत होत्या. बीपीची गोळी घेण्यासाठी बॅग उघडली असता दागिने मिळून आले नाही. मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एक संशयित मोरवाडी गाव येथे सराफाकडे सोन्याचे दागिने विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्याने दागिने चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी ५ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त केले. वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, सचिन खैरनार, मयूर पवार, सचिन करंजे यांच्या पथकाने ही कारवाई केली. संशयिताकडून रिक्षा प्रवासात चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. (मुंबई नाका पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: २०९/२०२५)
![]()

