
नाशिक। दि. २२ जून २०२५: गावठी कट्टा बाळगणाऱ्या संशयिताला ताब्यात घेण्यात आले. सराईत गुन्हेगार आकाश चंद्रकांत काळे (२८ रा. त्रिकोणी बंगल्याजवळ, हिरावाडी) असे या संशयिताचे नाव आहे. गुंडाविरोधी पथकाने हिरावाडी येथे ही कारवाई केली. संशयिताकडून कट्टा एक जिवंत काडतूस जप्त केले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुंडा विरोधी पथकाचे राजेश राठोड, कल्पेश जाधव यांना माहिती मिळाली. सराईत गुन्हेगार आकाश काळे हा गावठी कट्टा बाळगत असल्याची माहिती मिळाली. पथकाने हिरावाडी येथे सापळा रचला, संशयित वरदवेद दूध डेअरीजवळ उभा असल्याचे दिसून आले. पथकाने त्याला ताब्यात घेतले. अंगझडतीमध्ये गावठी कट्टा, जीवंत काडतूस असा ३० हजारांचे गावठी पिस्टल जप्त केले. सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या पथकाने ही कारवाई केली. संशयिताकडून शस्त्र तस्करीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
![]()

