नाशिक: हॉटेल मॅनेजरचे अपहरण करून ५ लाख लुटणारे तिघे जेरबंद

नाशिक। दि. १९ जून २०२५: हॉटेल मॅनेजरचे अपहरण करत जिवे मारण्याची धमकी देत मोबाइलवर क्रिप्टो करन्सी खाते उघडून ऑनलाइन ५ लाखांचे करन्सी खरेदी करणाऱ्या हायटेक अपहरणकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा आणि इंदिरानगर पोलिसांनी नौपाडा (ठाणे) आणि इगतपुरी येथे ही कारवाई केली. साजीद हमीद शेख, कुणाल अनिल जरिया व प्रवीण हिरामण देवकुळे अशी अपहरणकर्त्यांची नावे आहेत.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: गंभीर गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या संशयिताला बेड्या !

पोलिसांनी दिलेली माहिती अशी हॉटेल मॅनेजर पुनावाला हे मोपेडने पाथर्डी येथे घरी जात असताना रात्री ११.३० वाजता कारने पाठलाग करत कारमध्ये बळजबरीने बसवून घेत पुनावाला यांच्या मोबाइलमध्ये क्रिप्टो करन्सी अ‍ॅप उघडून बँक खात्यातून ऑनलाइन ५ लाख १ हजारांची रक्कम काढून घेतली आणि अजून १० लाखांची मागणी केली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: भरधाव मोटारसायकलच्या धडकेत २४ वर्षीय युवतीचा मृत्यू

इंदिरानगर पोलिसांनी पैसे वर्ग झालेल्या बँक व्यवस्थापनाशी संपर्क साधून दोन लाख ५० हजारांची रक्कम फ्रीझ केली. गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने संशयितांचा तंत्रविश्लेषण शाखेच्या मदतीने साजिद शेख याचा नौपाडा (ठाणे) येथे माग काढून त्याला ताब्यात घेतले. संशयित देवकुळेला इगतपुरीत अटक केली. संशयितांकडून कार, दोन लाख ५० हजारांची रक्कम जप्त केली. महिनाभरापूर्वी कट रचल्याची संशयितांनी कबुली दिली.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here