Amazon

नाशिक: ७.६६ लाखांचा डोडा जप्त; पंचवटीतील गॅस रिपेअरिंग करणारा अटकेत

नाशिक। दि.९ जुलै २०२६: शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत पंचवटी परिसरातून तब्बल ७ लाख ६६ हजार ९५ रुपयांचा डोडा (अफूची बोंडे व चुरा) जप्त केला असून, या प्रकरणी राजस्थानमधील मूळ रहिवासी असलेल्या एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान अंमली पदार्थासह इतर मुद्देमाल असा एकूण ८ लाख ८३ हजार ४९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रवासी बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, ७ ते ८ जखमी

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जुलै २०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार, राजस्थान येथील एक व्यक्ती पंचवटीतील दत्तनगर, पेठ रोड परिसरातील आपल्या राहत्या घरी विक्रीसाठी डोडा साठवून ठेवत असल्याची माहिती मिळताच पथकाने तातडीने नियोजन करून परिसरात सापळा रचला.

त्यानंतर संशयिताच्या घरावर छापा टाकून झडती घेतली असता, ५१.०७३ किलोग्रॅम डोडा (अफूची बोंडे व चुरा) आढळून आला. जप्त केलेल्या अंमली पदार्थाची अंदाजे किंमत ७ लाख ६६ हजार ९५ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिककरांसाठी आज (दि. ६) रंगणार सुरेल ‘भावतरंग’; भावगीतांची अविस्मरणीय मैफल

अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव सुभाष मंगळाराम बिष्णोई (वय ४२) असे असून तो मूळचा इसरवालोकी ठाणी, चिराई, ता. तिवरी, जि. जोधपूर (राजस्थान) येथील रहिवासी आहे. तो गेल्या दहा वर्षांपासून पंचवटी परिसरात वास्तव्यास असून परिसरात गॅस रिपेअरिंगचे काम करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विद्यार्थ्यांना अडवून लुटणारा संशयित चेंबूरमधून जेरबंद; २४ तासांत गुन्ह्याचा छडा

या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. अंमली पदार्थाचा स्रोत, पुरवठा साखळी आणि या रॅकेटमधील इतर संबंधित आरोपींचा शोध घेण्यासाठी शहर गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथक पुढील तपास करत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790