🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: दुखापतीच्या गंभीर गुन्ह्यातील चार आरोपींना अटक !

नाशिक। दि. ८ फेब्रुवारी २०२६: सातपुर परिसरातील प्रबुद्धनगर येथे चहाटपरीवर काम करत असताना एका रिक्षाचालकावर बाटलीने हल्ला करून वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने चार आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी सातपुर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ८.४५ वाजता समाधान रमेश अहिरे (वय ४५, व्यवसाय—रिक्षा चालक) हे पत्नी, मुलगा व जावई यांच्यासह प्रबुद्धनगर येथील चहाटपरीचे साहित्य आवरत असताना संशयित आयुष उर्फ बाळा अशोक पटेकर व त्याच्या साथीदारांनी कोणतेही कारण नसताना शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर एका आरोपीने अहिरे यांच्या डोक्यावर बाटली फोडून जखमी केले, तर इतरांनी फेवरब्लॉकने वाहनाचे नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील धरण साठा समाधानकारक; मात्र उन्हाळ्यासाठी पाणी नियोजनाचे आव्हान

दरम्यान, दि. ७ फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखा अंबड युनिटला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मुख्य आरोपी आयुष उर्फ बाळा अशोक पटेकर हा रामवाडी परिसरात असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दुपारी १.४० वाजता त्याला ताब्यात घेतले. पुढील चौकशीत इतर सहआरोपींची नावे निष्पन्न झाली. त्यानंतर संकेत उर्फ डुब्बा हिरामण गांगुर्डे (वय १९), रोहीत उर्फ खंगा भास्कर झोले (वय २१) आणि यश उर्फ बापु आतिष शेलार (वय २०) यांना दुपारी २.१० वाजता प्रबुद्धनगर, सातपुर येथून ताब्यात घेण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नाशिक विमानतळ विस्तारीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन

ताब्यात घेण्यात आलेले सर्व आरोपी या गुन्ह्यातील आवश्यक आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना सातपुर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुहास क्षिरसागर, हवालदार प्रकाश बोडके, पोहवा. योगेश चव्हाण, भुषण सोनवणे, भगवान जाधव व महिला पोलीस अंमलदार सविता कदम (अंबड गुन्हे शाखा) यांनी केली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790